विशाल कदम
लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली जि. पुणे) येथील एका ऑफिसचे मेनगेटचे व दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी हांडेवाडी चौकातून बुधवारी (ता.८) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
शिवाजी नामदेव पल्लेवाड (वय २२, धंदा मजुरी, रा. सध्या रा. कापरे बिल्डींग, हांडेवाडी, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. डोनगांव, ता. औराद, जि. बिदर राज्य कर्नाटक), गणेश उत्तम उमाप (वय २३, धंदा पेंटर, रा. हाडेवाडी चौक, ता. हवेली, जि.पुणे मुळ रा. अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आदेश दिलीप सातव (वय ३५ , रा. सावता माळी तालीम शेजारी, नारळीचा वाडा, उरुळी देवाची, ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश सातव यांचे उरुळी देवाची परिसरात रिव्हाइझ नावाने स्क्रॅपचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून दुकानातील एलइडी टि.व्हि एच.पी कंपनीचा लॅपटॉप, आयबॉल कंपनीचा लॅपटॉप व रिअल मी कंपनीचा टॅब चोरून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी सातव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरूधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत आसताना, पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांना उरुळी देवाची येथील घरफोडीतील आरोपी हांडेवाडी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने हांडेवाडी चौकात सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले.
दरम्यान, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींकडून दाखल गुन्हयातील मुद्देम्माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, बोरावके, जाधव, नागलोत, देवीकर, पवार, शिरगीरे, कुदळे, वीर आणि महिला पोलीस शिपाई विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.