Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निरा भीमा कारखान्याकडून लवकरच ऊस बिले अदा होणार – अध्यक्ष लालासाहेब पवार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 February 2023, 18:52

दीपक खिलारे

इंदापूर : चालु गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांना बिले मिळण्यास थोडा विलंब झाला असला तरी लवकरच ऊस बिले अदा केली जातील. इंदापूरच्या आमदारांनी अध्यक्षपद सांभाळलेला छत्रपती साखर कारखान्याला अडचणीत आणण्यास जबाबदार कोण ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये आमदारांनी एखादी तरी सहकारी संस्था उभी करावी व मगच इतरांच्या सहकारी संस्थांवर आरोप करावेत, असे प्रत्युत्तर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सोमवारी दिले.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी नीरा भीमा कारखान्यावर टीका केली होती, त्यास अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

 

ज्यांनी आयुष्यभरात एकही सहकारी संस्था काढली नाही, त्यांना विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे करताना व त्या यशस्वीपणे चालविताना किती कष्ट व वेळ द्यावा लागतो, त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव काय असणार? असा माजी राज्यमंत्र्यांना सवाल करून लालासाहेब पवार पुढे म्हणाले, कोणतीही सहकारी संस्था चालविताना तात्पुरता चढ-उतार येत असतो.

कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली नीरा भीमा कारखान्याने गेली २२ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. या विश्वासाच्या जोरावरच कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.

निरा भिमामुळे या परिसराचा विकास झाला असून, हजारो संसार हे नीरा भीमा कारखान्यामुळे उभे राहिले आहेत, असे लालासाहेब पवार यांनी स्पष्ट केले. एखाद्या संस्थेवर टीका करणे अतिशय सोपे असते, मात्र ती संस्था उभी करण्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात, याची जाणीव टीका करणाऱ्यांनी ठेवावी, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती कारखाना हा राज्यातील जुना कारखाना असून घोलप, चोपडे, निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या काळात राज्यात भरभराटीस आला होता. या कारखान्याचा आदर्श घेऊन राज्यात अनेक कारखाने उभे राहिले. असा हा आदर्श असलेला कारखाना मात्र माजी राज्यमंत्री हे कारखान्याचे अध्यक्ष झाल्यापासून अडचणीत आला आहे.

सध्या राज्यमंत्री कामकाज पाहत असलेला छत्रपती अडचणीत आल्याने, त्यांना इतर कारखान्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असे लालासाहेब पवार यांनी स्पष्ट केले.

आमदार भरणे यांच्या छत्रपती साखर कारखान्यापेक्षा निरा भिमा साखर कारखान्याने नेहमीच अधिकचा भाव दिला आहे. तसेच गेल्या २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये निरा भीमाने ऊसाची वेळेवरती व शेतकऱ्यांना इतर त्रास न होता तोडणी करून जास्त दर दिला आहे. त्यामुळे भरणे यांनी स्वतःच्या छत्रपती कारखान्याकडे अधिक लक्ष दिले तर बरे होईल, असा टोला अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी लगावला.

निरा भिमा कारखाना सध्या हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली मजबुतीने उभा असून, चालू २०२२-२३ च्या २२ व्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने आज सोमवार अखेर ५ लाख ६० हजार मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असून उपपदार्थ निर्मितीचे सर्व प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरु आहेत, अशी माहितीही अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

उरुळी देवाची येथे घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलीसांनी हांडेवाडी चौकातून ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.