विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. (Loni Kalbhor News) तसेच वरील तीनही जणांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आल्याची घोषणा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी केली.
नागरीकांचे आंदोलन मागे…
दरम्यान अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह, दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयात बदली करण्याबरोबरच, तिघांचीही खातेनीहाय चौकशी सुरु केल्याने रविवारी लोणी काळभोर पोलिसांच्या विरोधातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भोसले कुटुबिंयाच्या वतीने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले यांनी केली आहे. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास भोसले चाळीसमोर संतोष भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापत असतांना पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या तीन सहकारी पोलिसांनी अल्पवयीन मुले व काही नागरीकांना बेदम मारहाण केली होती. यावेळी मारहाण करु नये अशी विनंती करणाऱ्या महिलांनाही पोलिसांना शिवीगाळ केली होती. (Loni Kalbhor News) याबाबतची लेखी तक्रार मिळूनही वरीष्ठांनी वैभव मोरे यांच्यासह संतोष राठोड व सभांजी देवीकर या त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबत ठोस भुमिका न घेतल्याने, नागरीकांच्यात मोठी नाराजी पसरली होती.
घडलेल्या घटनेस 48 तास उलटुनही, वरील तिघांच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने, संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी (ता. 21) रोजी गावातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याबरोबरच, पोलिस ठाण्यावर मोर्चाचे नियोजन केले होते. (Loni Kalbhor News) मात्र शनिवारी सकाळीच पोलिस निरीक्षक कारवाईबाबत माहिती दिल्याने, भोसले कुटुंबियांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना संतोष भोसले म्हणाले, पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व सभांजी देवीकर या तिघांच्यावर कारवाईसाठी आम्ही रविवारी आंदोलणाचा इशारा दिला होता. मात्र वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व संभाजी देवीकर या तिघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याबरोबरच, तिघांच्याही तात्काळ मुख्यालयात बदल्या करण्यात आल्याची माहिती आम्हाला दिली आहे. (Loni Kalbhor News) या कारवाईमुळे आमचे समाधान झाल्याने, उद्या (रविवार)चे नियोजीत आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. याबाबतत पत्रही पोलिसांना दिले आहे.
दरम्यान याबाबत “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडलेला प्रकार चुकीचा होता. यामुळे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व सभांजी देवीकर या तिघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याबरोबरच, तिघांच्याही तात्काळ मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. (Loni Kalbhor News) पोलिस अथवा नागरीक, कोणीही चुकीचे वागल्यास, संबधितांच्या विरोधात कारवाई ही होणारच आहे.