Wednesday, May 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : “इथे का थांबला आहेस? असे म्हणत तिघांनी तरुणाला थेऊर फाट्याजवळ बेदम मारहाण करून लुटले

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 12:53

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. ८ : पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या थेऊर फाटा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक लुटमारीच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मूळ गावी जात असताना थकवा आल्याने काही वेळ आराम करण्यासाठी थांबलेल्या तरुणाला तिघा अज्ञातांनी घेरून बेदम मारहाण केली आणि त्याची दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम व बॅग जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (७ मे) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. Loni Kalbhor News

या प्रकरणी अनिल सिद्धेश्वर काळे (वय २६) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल काळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून सध्या चाकण येथील जामदार वस्ती परिसरात वास्तव्यास आहेत. ते महिंद्रा कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करत असून आपल्या टीव्हीएस रायडर दुचाकीवरून मूळ गावी सताळा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे निघाले होते. Loni Kalbhor News

 

अनिल काळे यांनी ६ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चाकणहून प्रवास सुरू केला. सलग प्रवासामुळे थकवा जाणवत असल्याने ७ मे रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते थेऊर फाटा परिसरातील काळभोरवाडा येथील एका मोकळ्या जागेत थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले. मात्र, काही क्षणांतच त्यांच्या आयुष्यात भीषण प्रसंग ओढवला. अनिल काळे हे विश्रांती घेत असताना काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडवरून तिघे अज्ञात तरुण तेथे आले. “इथे का थांबला आहेस? ही थांबायची जागा आहे का?” असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

अनिल यांनी “मी फक्त थोडा वेळ आरामासाठी थांबलो आहे,” असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यातील एका आरोपीने अनिल यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि १८०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. दुसऱ्याने त्यांच्या हातातील बॅग आणि दुचाकीची चावी खेचून घेतली, तर तिसरा आरोपी धक्काबुक्की करत धमक्या देत होता. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी अनिल यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी एमएच २४ बीटी ४४९५ क्रमांकाची काळ्या रंगाची टीव्हीएस रायडर दुचाकी, ओप्पो मोबाईल, रोख रक्कम आणि बॅग असा एकूण सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. Loni Kalbhor News

दरम्यान, आरोपींपैकी एकाने निळा टी-शर्ट व जिन्स घातली होती, दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा डिझाईन असलेला टी-शर्ट व काळी पँट, तर तिसऱ्याने काळा टी-शर्ट व काळी पँट घातली होती. “त्यांचे चेहरे लाईटच्या उजेडात स्पष्ट दिसले असून पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो,” असे अनिल काळे यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), ३०९(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Pune : शादी डॉट कॉमवर जुळलं नातं; लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांनी संसार उद्ध्वस्त! “१५ तोळे सोने, फ्रिज, टीव्ही, २ लाख रुपये आण…” म्हणत विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.