Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान रात्री अकरा नंतरही चालु असलेल्या हॉटेल, लॉजसह सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांच्यावर कारवाईचा बडगा उघारला आहे. मात्र ही कारवाई करतांना मात्र चोर सोडुन सन्याशाला फाशी देत असल्याचे कारवाई दरम्यान स्पष्ठ झाले आहे. loni Kalbhor News
एकीकडे हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान रात्री अकरा नंतरही चालु असलेल्या हॉटेल, लॉजसह सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांच्यावर कारवाई होत असली तरी, यात रस्त्यावर बेकायदा चालणाऱ्या सर्वच प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना अभय मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार चालु असल्याचे पुढे आले आहे. loni Kalbhor News
सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान हॉटेल, बार, लॉजच्या बाहेर महामार्गाच्या बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण, मद्यपींचा वाढता वावर, वाढती गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसरात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढले आहेत. त्यातच हाणामारी, किरकोळ अपघात, मोठे अपघात होत असून त्याचाच परिणाम मोठ्या भांडणात होत आहे. या भांडणाच्या रागातूनच खून करतो, बघतो असे म्हणून खुनाचा प्रयत्न काही गुन्हेगार करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. loni Kalbhor News
महामार्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये अवैधरीत्या सर्व प्रकारच्या दारू मिळत आहेत. अनेक तरुण दारू पिऊन रस्त्यावर भरदिवसा तसेच रात्री धिंगाणा घालीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मारहाण, धमकी देणे, असे सर्हास प्रकार सध्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु आहेत. मात्र पोलिसांनी या सर्वांकडे मी करतो मारल्यासारखे तुम्ही करा रडल्यासारखे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलीसही काही करू शकत नसल्याचा थेट आरोप काही गुन्हेगार करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या खाकीचा वचक कमी झाल्याचा नागरिक बोलत आहे. loni Kalbhor News
हडपसर व लोणी काळभोर पोलिसांच्याकडे हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान हॉटेल्स, बार, लॉजमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून रस्त्यावरच धिंगाणा घालतात. त्यातून शिवीगाळ, भांडणे होतात. महामार्गालगतच्या अनेक बार, लॉजच्या परिसरात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहने तेथेच थांबतात. रात्रीच्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण मद्यपान करून महामार्गावर स्टंटबाजी करतात. त्यातून अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हडपसर व लोणी काळभोर पोलिसांचे दुर्लक्ष..
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गालगत हॉटेल्स, बार, लॉजची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. दुकानातील वाहने थेट रस्त्यात थांबत असल्याने, अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमानात वाढले आहे. मागील सहा ते आठ महिन्यांपासून हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढतच चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे पुणे शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला धाक आता कमी होताना दिसत आहे. हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे मात्र नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. यामुळे हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी लोणी काळभोर पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.
कवडीपाट टोलनाक्यावर रात्री अकरानंतरही धांगडधिगा चालुच..
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर रात्री अकरानंतरही, लोणी काळभोर पोलिसांच्या नातावर टिच्चुन धांगडधिगा चालुच असतो. कवडीपाट टोलनाका परीसरात पोलिसांच्या आशिर्वादाने पहाटे तीन ते चार पर्यंत सर्वच प्रकारचे नियमबाह्य धंदे चालु असल्याचे चित्र दिसुन येत आहे. शुक्रवारी (ता. 7) रात्री पुणे शहर पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी कवडीपाट टोलनाक्याच्या परीसरात असतांनाही, रात्री बारा वाजनेच्या सुमारास एक मटका चालक मोठ्या आवाजात गाणी लावुन नाचत असल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी संबधित मटका चालकाला इंगा दाखवला असला तरी, त्याचे चेले मात्र त्यानंतरही त्याच ठिकाणी पहाटे तीन पर्यंत पोलिसांच्या नावाने शिवीगाळ करत असल्याचे चित्र स्थानिक नागरीकांना पहायला मिळाले. एक मटका चालक जर पोलिसांच्या नाकावर टिच्चुन रात्री अकरानंतरही धांगडधिगा चालुच ठेवत असले तर, नागरीकांनी तक्रार तर कोणाकडे करावयाची असा प्रश्न स्थानिक नागरीकांच्या समोर उभा राहिला आहे.
टोलनाका ते कवडीमाळवाडी रस्त्यावर “फळकुट दादा” वाढले..
कवडीपाट टोलनाक्यापासुन माळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील सहा महिण्यापासुन अचाणकपणे “फळकुट दादा” वाढल्याचे दिसुन येत आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासुन रात्री बारा ते एक वाजेपर्यंत अनेक तरुण मुले (फळकुट दादा) रस्त्यात दुचाकी उभी करुन, त्यावर बसल्याचे चित्र मोठ्या प्रमानात आढळुन येत आहे. हे फळकुट दादा रस्त्यावरुन येजा करणाऱ्या महिला व मुलींची छेड काढतांना दिसुन येत आहेत. मात्र रस्त्यात बसणारी सर्वच मुले ही स्थानिक असल्याने, या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या महिला तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करत आहे. या रस्त्यावर थांबणाऱ्या “फळकुट दादा” च्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे.