Loni kalbhor News लोणी काळभोर : समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महिलांसाठी कायदे व सुरक्षा’ तयार केली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करून महिलांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रभावीपणे काम करत आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले. (Loni kalbhor News)
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठात ‘महिलांसाठी कायदे व सुरक्षा’ व अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान या विषयावर गुरुवारी (ता.३) कार्यशाळेचे आयोजीत करण्यात आले होते. यावेळी विक्रांत देशमुख बोलत होते. (Loni kalbhor News)
यावेळी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, ॲड. पिंकी राजगुरू, अंमलदार रामदास मेमाणे, शाळेतील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Loni kalbhor News)
पुढे विक्रांत देशमुख म्हणाले, समाजात वावरताना अनेक ठिकाणी अश्लील कमेंट्स, हावभाव करणे, धमकावणे, सोशल मीडियातून बदनामी, छेडछाडीचे प्रकार घडत असतात. हे गुन्हे असून, यासाठी कायद्यात अनेक कलमांची तरतूद आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती विद्यार्थिनींना असणे गरजेचे आहे.
या प्रकारचा कोणताही गुन्हा निदर्शनास आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष किंवा लोणी काळभोर पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून त्याविषयी विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन विक्रांत देशमुख यांनी केले. (Loni kalbhor News)
दरम्यान, यावेळी ॲड. पिंकी राजगुरू ॲडव्होकेट भरोसा सेल यांनी महिलांविषयीच्या कायद्यासंबंधी (पोस्को व IPC ३५४) बाबत माहिती दिली. तर शाळेतील मुली व मुलांना आत्मविकास, स्वसंरक्षण, स्व प्रेरणा तसेच अमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबतची माहिती व मार्गदर्शन अश्विनी राख यांनी केले. (Loni kalbhor News)