Loni Kalbhor News | लोणी काळभोर, (पुणे) : उन्हाळी सुट्टीत बारामती येथून आजी आजोबांकडे भेटण्यासाठी आलेल्या बावीस वर्षीय तरुणाचा लोणी काळभोर हद्दीत रामदऱ्या जवळ नवीन उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झालाे. ही घटना रविवारी (ता. ०७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
झहीर समिर सय्यद (अंदाजे वय – २२ मु. पो. बारामती, फलटण नाका, निलम पेलेस) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. झहीर हा लोणी काळभोर येथील दिलावर अब्दुलहमीद इनामदार (इनामदारवस्ती, लोणी काळभोर) यांच्याकडे कांही दिवसापुर्वी उन्हाळी सुट्टीत आला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झहीर सय्यद यांचे आजी-आजोबा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती या परिसरात राहतात.
पाण्याचा अंदाज न आल्याने….
झहीर हा रविवारी दुपारी तीन वाजता रामदरा परिसराकडे जाणाऱ्या मुळा मुठा कालव्यात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने कालव्यात उडी मारली यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या वर येऊ शकला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता कोठेही आढळून आला नाही.
दरम्यान, सोमवारी (ता. ०८) सकाळी सहा वाजता त्यााचा मृतदेह हा लोणी काळभोर हद्दीतच वाहून जाताना दिसून आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस, लोणी काळभोर ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला. लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.