Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लाल मातीच्या व्यवहारातून जवळकर कुटुंबात राडा! मारहाण, लोखंडी हत्याराने वार अन् वाहनांची तोडफोडी, 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 August 2026, 13:28

लोणी काळभोर : लाल मातीच्या व्यवहारातील अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील जोरदार हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) परिसरात रविवारी (ता.9) घडली. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एका तक्रारीत लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याचा, तर दुसऱ्या तक्रारीत घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण, वाहनांची तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष भाऊसाहेब जवळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून केतन व कुणाल जवळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत केतन दीपक जवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश भाऊसाहेब जवळकर (वय – 50) मनिष ऊर्फ मनोज भाऊसाहेब जवळकर (वय 48) राहुल विलास जवळकर (वय 35) सचिन विलास जवळकर (वय 35) व धनंजय कैलास जवळकर (वय- 32 सर्व राहणार आळंदी म्हातोबाची ता हवेली जि पुणे) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष जवळकर हे नर्सरी व्यवसाय करतात. नर्सरीसाठी लाल माती पुरविण्याचा व्यवहार केतन दीपक जवळकर व कुणाल दीपक जवळकर यांच्याशी झाला होता. एका हायवा लाल मातीसाठी 18 हजार रुपये ठरले होते. त्यापैकी 10 हजार रुपये रोख दिल्यानंतर उर्वरित आठ हजार रुपये देण्यात आले. मात्र, त्यानंतर आणखी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप मनीष जवळकर यांनी केला आहे.

9 ऑगस्ट रोजी सकाळी नर्सरीमध्ये या व्यवहारावरून वाद झाला. त्यावेळी अतिरिक्त पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याने आपल्याला मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मनीष जवळकर यांनी केली. त्यानंतर सायंकाळी पत्नीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना केतन व कुणाल जवळकर यांनी रस्त्यात अडवून धक्काबुक्की केली आणि दुचाकीवरून खाली पाडले. केतनने लोखंडी हत्याराने आपल्या खांद्यावर वार केल्याचा आरोप त्यांनी केला.

 

दरम्यान, या हल्ल्यात आपण बेशुद्ध झालो. आपल्याला सोडविण्यासाठी आलेल्या भावावरही हत्याराने वार करण्यात आला, तर पत्नीला मारहाण करण्यात आल्याचे मनीष जवळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. मनीष यांच्यावर मांजरी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांचा भाऊ धनंजय जवळकर याच्यावरही उपचार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दुसऱ्या गटाचीही पोलिसांत धाव; घरात घुसून मारहाणीचा आरोप

केतन जवळकर यांनीही लोणी काळभोर पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. सकाळी लाल मातीच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर परस्पर तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी समज देऊन सर्वांना सोडले होते. मात्र, सायंकाळी काही जणांनी संगनमत करून आपल्या घराच्या पोर्चमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि आपल्यासह आई, वडील व भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केतन यांनी केला आहे. या मारहाणीत आपल्यासह कुटुंबीयांना दुखापत झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच संबंधितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि हायवा गाडी पेटवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दोन वाहनांची तोडफोड केल्याचाही आरोप

हल्लेखोर निघून जाताना आपल्या मालकीची हुंदाई व्हर्ना कार आणि ओला इलेक्ट्रिक दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोप केतन जवळकर यांनी केला आहे. या घटनेनंतर गावातील नागरिक जमा झाले आणि त्यानंतर कुटुंबीयांसह लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश जवळकर, मनिष जवळकर, राहुल जवळकर, सचिन जवळकर व धनंजय जवळकर या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच व्यवहारातून सुरू झालेला वाद सकाळच्या शाब्दिक संघर्षापासून सायंकाळच्या कथित हाणामारीपर्यंत पोहोचल्याने म्हातोबाची आळंदी परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने या प्रकरणाचा नेमका वाद कोणत्या कारणावरून आणि कशाप्रकारे वाढला, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13
Next Post

‘अंमली पदार्थांना NO म्हणण्याचे धाडस!’ पुणे ग्रामीण पोलिसांचे व्यसनमुक्तीसाठी रणशिंग; अवैध धंदे सोडणाऱ्यांना रोजगाराचेही बळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp