Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 3 October 2026, 16:55

उरुळी कांचन : अवैध गावठी हातभट्टीची दारू निर्मिती आणि विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी उरुळी कांचन पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. वारंवार कारवाई करून हातभट्टीची दारू विक्री बंद केल्यानंतर संबंधित कुटुंबांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी ‘मिशन परिवर्तन’ संस्थेच्या सहकार्याने जनजागृती सुरू केली आहे.

शनिवारी (ता. 03) उरुळी कांचन येथील पांढरस्थळ, शिंदवणे हद्दीतील काळे शिवार आणि भवरापूर येथील कंजारभट वस्त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी पोलीस पथकासह भेट दिली. यावेळी मिशन परिवर्तन संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते. यापूर्वी या वस्त्यांमध्ये अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जात होती. पोलिसांनी सातत्याने छापे टाकून आणि गुन्हे दाखल करून ही अवैध दारू विक्री व निर्मिती बंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, सोमनाथ चितारे उपस्थित होते.

सध्या संबंधित कुटुंबे मजुरीची कामे करीत असून, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी आणि उपजीविकेची साधने उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला वस्त्यांमधील महिला आणि मुलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढे रोजगार करू; मात्र दारू विक्री करणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी पोलिसांना दिली. केवळ कारवाई नव्हे, तर अवैध व्यवसायापासून दूर झालेल्या कुटुंबांना शाश्वत रोजगाराच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

“रोजगार करू, पण आता दारू विकणार नाही”

पोलिसांच्या आणि संस्थेच्या या सकारात्मक पुढाकाराला वस्तीमधील महिला आणि बालकांनी अत्यंत उत्तम आणि संवेदनशील प्रतिसाद दिला. “यापुढे आम्ही कष्टाचा रोजगार करू, पण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दारू विक्रीच्या बेकायदेशीर धंद्याकडे वळणार नाही,” अशी ग्वाही या वस्तीतील महिलांनी पोलीस प्रशासनाला दिली.

 

गुन्हेगारीमुक्तीसाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरूच राहणार..

अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी सुधारणा व्हावी आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी उरुळी कांचन पोलिसांकडून अशा सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. गुन्हेगारीमुक्तीसाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी सांगितले. तसेच पोलिसांच्या या कारवाईसोबतच पुनर्वसनाच्या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण हवेली परिसरातून कौतुक केले जात आहे

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55

निवडणूक कर्तव्याला दांडी; सहाय्यक अभियंता शुभांगी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 3 October 2026, 16:50

पुर्णेकर हत्याकांडात ‘लावण्या’ची एन्ट्री! हत्येपूर्वीची तिची हालचाल संशयाच्या भोवऱ्यात,पोलिसांच्या तपासाला नवी दिशा

Saturday, 3 October 2026, 16:44

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07
Next Post

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp