Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अंमली पदार्थांना NO म्हणण्याचे धाडस!’ पुणे ग्रामीण पोलिसांचे व्यसनमुक्तीसाठी रणशिंग; अवैध धंदे सोडणाऱ्यांना रोजगाराचेही बळ

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 August 2026, 13:42

पुणे : अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याच्या विळख्यात अडकणाऱ्या युवकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आता केवळ कारवाईवर भर न देता जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसनाचा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. ‘अंमली पदार्थांना NO म्हणण्याचे धाडस’ या घोषवाक्याखाली पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सोमवारी (ता. 10) व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात व्यसनाधीन व्यक्ती, अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता समुपदेशन, पुनर्वसन आणि रोजगाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे.

अवैध धंदे सोडा; रोजगाराची संधी मिळवून देणार!

अंमली पदार्थ, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि मद्याची विक्री केल्याप्रकरणी वारंवार गुन्हे दाखल होऊनही काहीजण पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळतात. अशा व्यक्तींना या अवैध व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक मार्गदर्शन देण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. एनजीओच्या माध्यमातून अशा व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांना नवीन व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच काहींना रोजगार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

 

शाळा-महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज, सायबर क्राईम अन् महिला सुरक्षेची जनजागृती

१५ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज, सायबर क्राईम, वाहतूक नियम आणि महिला अत्याचाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात लाईव्ह कार्यक्रम घेऊन या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, यासाठी विशेष प्रबोधन करण्यात येणार आहे.

‘व्यसनाधीन व्यक्तीला दोष देऊ नका; त्याला पुन्हा उभे करा!’

व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्यच धोक्यात येत नाही, तर कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान, सामाजिक समस्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला केवळ दोष देण्याऐवजी समुपदेशन व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्याला व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे आवश्यक आहे, असा संदेश अभियानातून देण्यात आला.

पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले. ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ आणि ‘व्यसनमुक्त कुटुंब, सुरक्षित समाज’ या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या या अभियानामुळे पोलिसांच्या कारवाईसोबतच पुनर्वसनाच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

या अभियानात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पोलिस उपअधीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह आरोग्य विभाग, विविध व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था, एनजीओ, विधी सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05
Next Post

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रुग्णवाहिकेचे नवे भाडेदर लागू; जादा पैसे घेतल्यास 20 हजारांचा दंड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp