Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 17:46

पुणे : ‘मला भाऊच म्हणायचे, माझ्यापेक्षा मोठे व्हायचे नाही. तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का? मला ओळख देत नाहीस,’ असे म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडून त्याला मारहाण केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. तसेच तरुणाच्या खिशातील रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ओंकार शाहुराज जाधव (वय २७, रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम कांबळे (वय २७), निलेश कुडले (वय २५) आणि मनिष शेळके (वय २५, सर्व रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास बिबवेवाडीतील बकुळ हॉल आणि पापळ वस्ती गणपती मंदिराजवळ घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव हे २९ सप्टेंबर रोजी मोगरवाडी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी उत्तम कांबळे याने त्यांना आवाज देऊन थांबवले. दोघांमध्ये बोलताना ‘तू मला उत्तम म्हणणार का?’ असे म्हणत कांबळे याने ‘भाऊच म्हणायचे, माझ्यापेक्षा मोठे व्हायचे नाही’ असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर ‘तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का? मला ओळख देत नाहीस,’ असे म्हणत कांबळे याने जाधव यांच्या कानाखाली मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर जवळ असलेल्या कुत्र्याला ‘धर ह्याला’ असे सांगितल्यावर कुत्र्याने जाधव यांच्या दोन्ही पायांना चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कांबळे यानेही हाताने मारहाण केली. तसेच कोणाला तरी फोन करून ‘लवकर या, एकाला मारायचं आहे,’ असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp