Loni Kalbhor Crime लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली) येथे मांजराचे पिल्लू शोधण्यासाठी शेजारी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जहांगीरदार यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
लक्ष्मण मरीबा भुरे (रा. गणेश नगर, उरुळी देवाची ता. हवेली. जि.पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनिसार…!
पिडीत अल्पवयीन मुलगी आणि आरोपी लक्ष्मण भुरे हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. पिडीत मुलगी मांजरीचे पिल्लू शोधण्यासाठी आरोपी लक्ष्मण भुरे यांच्याघरी २० जून २०१८ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेली होती. तेव्हा आरोपीने पिडीत मुलीला घरात ओडले. त्यावेळी पिडीत मुलीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिचे तोंड दाबले व विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने पिडीतेला घरातील एका खोलीत डांबून ठेवले.
पिडीतेच्या घरातील नातेवाईक रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शोध घेत होते, तेव्हा नातेवाईकांनी आरोपी लक्ष्मण भुरे याचा दरवाजा वाजविला. तेव्हा त्याने आतून कसलाही प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नातेवाईकांना अधिकच संशय आला. आरोपीने पिडीतेला दम देऊन गप्प बसण्यास सांगितले आणि थोड्या वेळाने दरवाजा उघडला. त्यानंतर नातेवाईक थेट आरोपीच्या घरात घुसले. आणि पिडीत मुलीची सुटका केली. याप्रकरणी पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी लक्ष्मण भुरे याला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सुचित्रा नरोटे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला २ वर्षाची शिक्षा व दंड ठोठाविली आहे. हे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जहांगीरदार यांनी दिले आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे, पोलिस शिपाई गलाकाटे यांची मदत मिळाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:च्या पोटावर केले वार अन्