Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; किराणा दुकानदार महिलेच्या घरात सापडला 5 लाखांचा गुटखा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 May 2026, 10:47
Pune Crime: Gutkha being sold under the guise of vegetable stalls; Police crackdown in market yard

Photo-Social Media

Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 15 : पुणे जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, लोणी काळभोर परिसरात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल पाच लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण साठा एका महिलेच्या घरातून उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरात गुटखा माफियांचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा रंगू लागली आहे. Loni Kalbhor

वैशाली संजय खेतमाळीस (वय ४८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे व गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता.13 ) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, माळी मळा परिसरात एक महिला गुटख्याचा साठा करून विक्री करीत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. Loni Kalbhor

 

घर नव्हे, गुटख्याचे गोदामच!
पोलिसांनी घरात प्रवेश करताच हॉलमध्ये मोठमोठ्या पोत्यांमध्ये आणि बॅगमध्ये भरून ठेवलेला गुटखा पाहून अधिकारीही चक्रावले. उघड्यावरच ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, आर.एम.डी., रजनीगंधा, वी-१ तंबाखू, तुलसी तंबाखू, शॉट प्रीमियम च्युइंग टोबॅको यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. Loni Kalbhor

दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी एकूण ५ लाख ७ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले हे पदार्थ असून, त्यांची विक्री आणि साठवणूक गंभीर गुन्हा मानला जातो. तरीदेखील लोणी काळभोर परिसरात खुलेआम असा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. Loni Kalbhor

“कर्करोग विकणारा धंदा” सुरूच
गुटखा आणि सुगंधित तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग, हृदयरोग आणि इतर गंभीर व्याधी होतात, हे माहिती असतानाही नफेखोरीसाठी हा जीवघेणा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानाच्या आडून हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलीसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त करून नमुने सीलबंद केले असून उर्वरित साठा ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वैशाली खेतमाळीस यांच्याविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ – 26(2)(i),26(2)(iv),30(2)(a),31 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 123,223,274,275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटखा रॅकेटच्या मोठ्या मास्यांचा शोध सुरू
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका घरात पोहोचला कसा? यामागे कोणते पुरवठादार आहेत? पुणे जिल्ह्यातील इतर भागातही याचे नेटवर्क कार्यरत आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Loni Kalbhor

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Uruli kanchan : पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडीत दोन बल्करमध्ये कार चिरडली ; कारचे इंजिन आणि बोनेटचा चक्काचूर, जीवितहानी नाही..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.