पुणे : सातारा – पुणे महामार्गावर खेड – शिवापूर ग्रामपंचायत हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह ४४ लाख ५४ हजार ६०० रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकच्या पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ट्रकचालकासह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागराजु एडूकोंडलू अलकुंटा (वय-३८), शेख महाबुसुभानी चिन्नासेईदलू (वय-४५ दोघेही रा. हैदारबाई, चैन्नई मने रोड, कोपरापाडू बल्लीकुरवा जि. बापटला आंध्रप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १२) राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, सातारा – पुणे महामार्गावर खेड – शिवापूर ग्रामपंचायत हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्या अनुशंघाने परीसरातील खेड शिवापूर टोल नाक्याच्या उत्तरेस हॉटेल गावकरी समोर रोडवर सापळा रचून ट्रक चालकास, ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने सदर ट्रक रोडच्या कडेला उभा केला. वाहन चालकाने वाहनामध्ये लाकडाच्या भुशाने भरलेल्या गोण्या गोवा राज्यातून वाहनामध्ये भरुन ते घेवून जात आहे असे सांगितले
दरम्यान, सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळून आला. त्यानुसार ट्रकचालकास विचारपूस केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगतिले. ट्रकची तपसणी केली असता पोलिसांनी गोवा राज्यात विक्रीस असलेले ४४ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी सदर कारवाईमध्ये निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एस. व्ही. बोधे, ए.सी. फडतरे, जवान स्टाफ प्रताप कदम, अनिल थोरात, एस. एस. पौधे, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, अमोल दळवी यांनी सहभाग घेतला होता.