Kondhwa News | पुणे : पुण्यातील कोंढवा भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने कामावर जाताना टिफिन बनवून न दिल्याच्या रागातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पतीला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली दरम्यान उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कोंढव्यातील होलेवस्तीत शनिवारी ही घटना घडली.
शितल सोमनाथ पांडागळे (वय २७) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. सोमनाथ महादेव पांडगळे (वय ३०, रा. गणपती मंदिरच्या पाठीमागे उंड्री, होलेवस्ती कोंढवा, पुणे) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांनी त्यास अटक केली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी पती सोमनाथ याला कामावर जाताना पत्नी शितलने टिफिन बनवून दिला नाही. यावरून नवरा बायकोमध्ये वाद झाला. दरम्यान वादाचे रुपांतर मारामारीत झाले. आरोपी पतीने पत्नी शिलतला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केले. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली.
त्यानंतर जखमी शितलला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलीसांनी सोमनाथची चौकशी केली असता त्याने मारहाण केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khadakwasla Dam | मोठी बातमी : पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या
Indapur Subway | गोखळीच्या भुयारी मार्गावर सकारात्मक निर्णय घेणार : हर्षवर्धन पाटील