Kolhapur News : कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी त्यांची पत्नी आणि मुलासह शुक्रवारी विष प्राशन करून गळ्यावर सूरी ओढून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. उद्योगपती संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली ते जेलमध्ये देखील जाऊन आले होते. यानंतर ते तणावाखाली होते. त्या तणावामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे. (Kolhapur News) मात्र, एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
‘हे’ आहे धक्कादायक कारण
या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तणावाखाली गेले होते. (Kolhapur News) या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला असावा, असं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे हे त्यांच्या घरी होते. त्यांच्या बेडरूमचे दार आतून बंद होते. आज सकाळी त्यांनी सकाळी दरवाजा उघडला नाही. त्यांच्या आईने त्यांना हाका मारल्या. (Kolhapur News) मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे,(Kolhapur News) ती नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलीस करताहेत. संतोष शिंदे याच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून अंत केला. असा अंदाज लावला जात आहे. संतोष शिंदे हे गडहिंग्लज शहरात राहयला होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून राजकीय वादळ; हिंसाचाराचे पडसादही उमटणार?