कोल्हापूर : Kolhapur News – कोल्हापूर जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. (Kolhapur News) येथील करवीर तालुक्यातील माजी सरपंचाच्या पत्नीने पतीच्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Kolhapur News)
करवीर तालुक्यातील घटना
सुप्रिया बाजीराव वाडक (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप शामराव पाटील (वय 59, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून पती बाजीराव वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती बाजीरावने यांनी महिलेला माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता तसेच त्यांच्यावर सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. या सर्व प्रकाराळा कंटाळून अखेर सुप्रिया यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेतला. असे वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी बाजीरावचा शनिवारी वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी आपले पती बाजीराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बाजीराव हे काही कामानिमित्त बाहेरगावी निघून गेले. यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून सुप्रिया यांनी आपल्या राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :