Kishor Aware | तळेगाव दाभाडे, (पुणे) : मावळ तालुक्यातील उद्योगपती तसेच तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा शुक्रवारी (ता. १२) दुपारी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जोडलेल्या किशोर आवारे यांनी सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणातील आपले स्थान पक्के केले होते.
किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी शेजारी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले होते.
दरम्यान, तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Twitter News : ट्विटरचे नवीन फीचर्स, व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलची सेवा होणार उपलब्ध
Accident News : दशक्रिया विधीसाठी निघालेल्या पती पत्नीचा कात्रज परिसरात अपघाती मृत्यू