Khed Crime News | राजगुरुनगर, (पुणे) : खेड पंचायत समितीत बांधकाम शाखा अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा वनविभागाच्या जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बुट्टेवाडी रस्त्यावर वनविभागाच्या हद्दीत घडली घटना…
राजगुरुनगर शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या बुट्टेवाडी रस्त्यावर वनविभागाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
बी. एस. शिंदे असं सदर अभियंत्याचे नाव असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड पंचायत समितीमध्ये बी. एस. शिंदे हे बांधकाम शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. १४ मार्च रोजी शिंदे हे पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याची दुचाकी घेऊन ऑफिसमधून बाहेर पडले. मात्र बराच वेळ होऊन देखील ते परत आलेच नाहीत. त्यानंतर संबधित कर्मचारी आणि शिंदे यांच्या कारचालकाने त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही.
शिंदे यांचा शोध घेत असताना अखेर राजगुरुनगर शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या बुट्टेवाडी रस्त्यावर वनविभागाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहावर कोणतीही मारहाणीची कोणतही खून नव्हती किंवा विषारी औषध पिल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना घटनास्थळी मिळाला नाही. त्यामुळे शिंदे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबतचे गूढ निर्माण झालं आहे.
दरम्यान, खेड पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात असून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती
Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण