जीवन सोनवणे
Khandala News : खंडाळा, (सातारा) : शिरवळ औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय कंपनीला माल खरेदी करण्यासाठी पुरवठा करण्याची ऑर्डर देत पंजाबसह दुबई येथील कंपनी मालकाने २४ लाख ३३ हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिंदेवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत घटना घडली असून कंपनी मालकाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनी विरोधात गुन्हा दाखल..
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे शेतीविषयक औषधे बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीच्या मालकांना व्हॉट्सअँपवर लुधियाना येथील मॉडर्न इंन्सेक्टिसाइड लि. कंपनीच्या सहव्यवस्थापक पूनम यादव यांनी शेतीविषयक औषधांची माहिती मागवली. (Khandala News) कंपनी मालकांनी ही माहिती पाठविली. त्यावेळी शिंदेवाडी येथील कंपनीला ई मेलद्वारे एका औषधाची ऑर्डर दुबई येथील संबंधितांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार व दलाली करणा-या अँग्री व्हेन्चर एफझेडसी या कंपनीला पाठविण्यास सांगितले.
त्या कंपनीकडून मालाच्या एकूण ४१,३०० अमेरिकी डॉलर पैकी शिंदेवाडी येथील कंपनीला मालापोटी अनामत रक्कम ११,७९० अमेरिकी डॉलर भारतीय चलनानुसार ९ लाख ७२ हजार १०० रुपये जमा करण्यात आले. शिंदेवाडी येथील कंपनीकडून दुबईतील कंपनीला मालाचा पुरवठा करण्यात आला. (Khandala News) माल पोहोचल्यानंतर काही दिवसांनी बनावट व्हिडिओ पाठवत संबंधितांनी मालामध्ये तक्रार असल्याचे सांगत कंपनीकडून एकूण भारतीय चलनातील ३४ लाख ५ हजार १८५ रुपयांपैकी शिल्लक रक्कम २४ लाख ३३ हजार ९९ रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतं कंपनी मालकांनी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Khandala News) सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Khandala News : शेतकरी सभासदांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही – मकरंद पाटील..
Khandala News : शेतीच्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला ; एक किरकोळ तर दुसरा गंभीर जखमी..