गणेश सुळ
Kedgaon News : (पुणे) : वरवंड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका नामांकित सोन्या-चांदीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे तब्बल ७५ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळी हि घटना उघडकीस आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले होते.(Kedgaon News)
मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना.
वरवंड (ता. दौंड) येथील ए.बी. सराफ असे या दुकानाचे नाव असून रात्री किंवा पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर आणि आतील तिजोरी फोडून त्यातील मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Kedgaon News)
मिळालेल्या माहितीनुसार, वरवंड येथील रहदारीच्या ठिकाणी ए.बी. सराफ सोन्या-चांदीचे दुकान आहे. रहदारीच्या ठिकाणी असून देखील कसलीही चाहूल न लागता अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून सुमारे ७५ लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवून नेले आहेत. चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही वर स्प्रे मारला असून सीसीटीव्ही डाटाचा मशीन देखील चोरून घेऊन गेले आहेत.(Kedgaon News)
दरम्यान, दुकान वरवंड येथील रहदारीच्या ठिकाणी असून देखील कसलीही चाहूल न लागता चोरी झाली यामुळे सर्व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.