Katraj Accident | पुणे : कात्रज घाटात एकाच दुचाकीवरून चौघं जात असताना दुचाकीला अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेतली. मदतकार्यासाठी गेलेल्या पोलीसांना दुचारीस्वारांकडे हत्यारे दिसून आली. पोलीसांना त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस दिसून आली. चौघांपैकी एक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. संतोष राजू पासवान (वय २१, रा. बेनकर वस्ती, धायरी) असं आरोपीचं नाव असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलीस अंमलदार गणेश खंडू काळे यांनी फिर्याद दिली आहे.
चौघांपैकी एक घटनास्थळावरून फरार…
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज घाटातून ही मुले दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान शनिवारी पहाटे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलीसांना मिळाली.
पोलीसांनी लगलीच अपघातस्थळी धाव घेतली. तोपर्यंत चौघांपैकी एक पळून गेला. पोलीसांनी जखमींना ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेव्हा त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस आढळून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!