Karad News | सातारा : दारुची बाटली न दिल्याच्या रागातून एकाचा गळा दाबून व चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील तळबीड येथे घडली आहे.
महेंद्र शंकर वाघमारे (वय 47, रा. तळबीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तळबीड पोलीसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेंद्र यांना दारूचे व्यसन होते. शुक्रवारी ते दारू पिऊन तळबीड मधील ग्रामपंचायतीसमोरील मारुती मंदिरात झोपण्यास गेले. त्यावेळी तेथे त्यांच्याकडे एक जण आला महेंद्र यांच्याकडे असलेली दारूची बाटली मागू लागला. यास त्यांनी विरोध केला असता आरोपीने महेंद्र यांच्यावर चाकूने वार केला व गळा आवळला. त्यानंतर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा प्रकार लक्षात आणून दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!