पुणे : जादूटोणा आणि काळ्या जादूसाठी चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या पती-पत्नीला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे.
विमल संतोष चौगुले, (वय- २८), व संतोष मनोहर चौगुले, (वय- ४१, रा. दोघेही महादेवनगर जुन्नर, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार मंदार जवळे व विकास जाधव यांचे पथक शनिवारी (ता. २३) हद्दीत गस्त घालीत असताना दिलीप पवार यांना फोनद्वारे माहिती दिली की चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलगी वय ४, रा. संतकृपा हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली, पुणे हीस कोणीतरी पळवून नेहले आहे. व त्याचे मोबाईल लोकेशन हे जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखवत आहे. त्यानुसार तात्काळ पोलीस स्टाफला घेवुन जुन्नर शहरातील महादेवनगर, जुने एस टी स्टॅन्डजवळ संतोष मनोहर चौगुले यांचे राहते घरासमोर जावुन घराची पाहणी केली.
सदर तपास सुरु असताना या घरात एक महिला व एक पुरुष तसेच एक लहान मुलगी दिसली. त्यावेळी वॉट्सअॅपवर पाठविलेला पिडीत मुलीचा फोटो पाहुन संशय आल्याने सदर महिला व तीचे पती तसेच सदर अल्पवयीन मुलीस जुन्नर पोलीस स्टेशन येथे आणले. दोन्ही आरोपींना सदर गोष्टीबद्दल विचारले असताउडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावलेने तीचे पतीकडे तपास केला असता त्याने कबुली दिली की, सदरची मुलगी विमल चौगुले हिने पुणे येथील बहिणीचे शेजारी राहणारी मुलगी पळवून आणली आहे.
सदरची माहिती मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथील मा. डी. सी. पी काकासाहेब डोळे यांना सदरची माहिती दिली. व सदरची पिडीत मुलगी व महिला आरोपी विमल चौगुले व संतोष चौगुले यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे ताब्यात कायदेशिर कारवाई कामी देण्यात आले आहे.
सदरची कारवाई जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार भरत मुठे, संतोष पठारे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि तौफिक सय्यद चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय, पुणे हे करीत आहेत.