(Junnar) पुणे : सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे. अनेक ठिकाणी बगाड, बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहेत. मात्र खबरदारी न घेतल्याने यात्रेत अपघात देखिल होत आहेत. अशीच घटना जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत घडली आहे. यात्रेत गाडी-बगाडाला यात्रेत भीषण अपघात झाला आहे .या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताच थरार कॅमेरात कैद…!
पुण्यात ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला अपघात; वीर उंचावरून खाली पडले pic.twitter.com/ghgF6QSZRd
— Pune Prime News (@puneprime_news) April 6, 2023
सुनील चिलप आणि संदीप चिलप बगाड अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटला. या दुर्घटनेत दोन्ही बाजूचे वीर उंचावरून जमीनीवर पडून जखमी झाले आहेत. मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले. बगाडस्वार खाली पडल्यानंतर सर्वांची धावपळ उडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत त्यांना रुग्णालयात नेले.