नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूण-तरूणींचा शोध आता संपणार आहे. कारण ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ने स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट असणार आहे. अधिसूचनेनुसार, स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ची 1207 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
एसएससी स्टेनोग्राफर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागणार आहे. स्टेनोग्राफर पदाच्या भरतीसाठी 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी संगणकावर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदांसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रियेत दोन टप्पे आहेत. संगणकावर आधारित परीक्षा आणि कौशल्य चाचणी.
जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा…
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट
अर्जातील दुरुस्ती – 24 आणि 25 ऑगस्ट
संगणक आधारित चाचणी – 12 आणि 13 ऑक्टोबर
अर्ज शुल्क किती असणार?
SC/ST प्रवर्गातील महिला उमेदवार, दिव्यांग आणि माजी सैनिक यांना अर्ज विनामूल्य इतर प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये भरावे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून सूचना पाहावी.