Jalgaon News : जळगाव: तपासासाठी निघालेल्या एका पोलिस पथकाच्या ताफ्यावर मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जाताना ही घटना घडली. ही घटना गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ घटना घडली.
पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जाताना घडली घटना
सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. हे अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी तसेच चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे यांचे पथक गुरुवारी पिलखोड येथे तपासासाठी जात होते. (Jalgaon News) तपासाला जात असतांना रात्री ९ च्या दरम्यान, एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ चालत्या वाहनावर मोठे झाड कोसळले. यात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा मृत्यू झाला तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तिघे जखमी झाले.
दरम्यान, या अपघाताचे वृत्तसमजताच, कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. (Jalgaon News) जखमींना एरंडोल येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jalgaon News : लग्नानंतर दोन दिवसात नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या
Jalgaon News : जळगावात सुन्न करणाची घटना ; मम्मी, पप्पा…सॉरी…म्हणत उच्चशिक्षित तरुणीने घेतला गळफास
Jalgaon News : वंचित आघाडीला मविआचे दरवाजे बंद… शरद पवार यांचा मोठा आरोप; म्हणाले…