Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : जालन्यात इन्कम टॅक्सची रेड, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ वऱ्हाड्यांच्या गाडीतून आले, ४०० कोटींचं घबाड जप्त केले ; १०० अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास पैशांची मोजणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 10:21

पुणे : जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार दुल्हन हम ले जाएंगे असे स्टिकर आयकर विभागाच्या गाड्यांवर लागले होते. अर्थात हे अधिकारी वऱ्हाडाच्या वेशात आले आणि बेनामी संपत्ती साठवून ठेवलेल्या स्टील व्यावसिकांचा बाजार उठवून गेले.

या कारवाईत रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

 

दरम्यान, छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने पुण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन ; स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.