Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने पुण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन ; स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 10:58

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी हवेली आणि त्याअंतर्गत हवेली, पुणे शहर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती पुणेच्या सहकार्याने आज सकाळी मामलेदार कचेरी येथून शुभारंभ झालेल्या प्रभात फेरीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभात फेरीच्या मार्गावरील नागरिकही प्रभात फेरीत सहभागी होत गेल्याने रॅलीतील उत्साह वाढला. पावसातही हातात तिरंगा घेऊन नागरिक भारतमातेचा जयघोष करीत होते.

‘वंदे मातरम्, वंदे मातरम्’ … भारत माता की जय… हर घर तिरंगा’… अशा घोषणांमधून प्रकटणारी देशभक्तीची भावना.. युवक, महिला व लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हाती असलेला तिरंगा…. देशभक्तीच्या भावनेला जोरदार पावसाच्या जलधारांनीही बरसत दिलेली साथब अशा उत्साहाच्या वातावरणात पुणेकर नागरिकांनी पावसात उत्साहाने प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला. विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रभात फेरीचा समारोप झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी देखील प्रभातफेरीत सहभाग घेतला. विधानभवन येथे स्वातंत्र्य सैनिक हरिहर नाबर यांचा तसेच सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचे वारस मंदाकिनी जाधवराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारांचे, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे, व देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र तसेच राज्य शसनाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करणत आले आहे. पुणे विभागात देशभक्तीपर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

 

तहसीलदार कोलते पाटील यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवत नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली, असे त्यांनी सांगितले.

आद्य क्रांतीवीर हुतात्मा उमाजी नाईक स्मारकाला वंदन करून प्रभात फेरीचा शुभारंभ झाला. उमाजी नाईक स्मारक, राष्ट्र भूषण चौक, घोरपडे पेठ पोलीस चौकी, दलाल पान शॉप, महात्मा फुले स्मारक, लोहिया नगर, सोनावणे हॉस्पिटलमार्गे मल्लिका पासून पुढे जुना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, शांताई हॉटेल, लाल देऊळ, जिल्हा परिषद नवीन, ब्लू नाईल हॉटेल मार्गे विधान भवन येथे प्रभातफेरीचा समारोप झाला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

Monday, 10 August 2026, 17:26

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

Monday, 10 August 2026, 16:44

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

Monday, 10 August 2026, 16:35

नवऱ्याला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत राहायला गेली; संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य, पुण्यातील भयंकर प्रकार….

Monday, 10 August 2026, 15:59

तो एक साधा डिलिव्हरी बॉय पण पुण्यात घेतलं आलिशान घर; पैसे कमवण्यासाठी करायचा ‘तसला’ प्रकार; कारनामा ऐकून पोलिसही हैराण…

Monday, 10 August 2026, 15:31
Next Post

Loni Kalbhor Crime- पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊऱफाटा येथील छेडछाड प्रकरणातील तीन अल्पवयीन रोडरोमियोंना लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यात, रोडरोमियोंना पोलिसांच्या कचाट्यातुन सोडविण्यासाठी राजकीय नेते व  उद्योजक सरसावले,  मुलींच्यात असंतोषाचे वातावरण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.