Jagannath Rath Yatra वृत्तसंस्था : त्रिपुरातील जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटन घडल्याची बातमी समोर आले आहे. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील कुमारघाटमधून भगवान जगन्नाथ यांची यात्रा काढण्यात येत होती. (Jagannath Rath Yatra) या रथयात्रेत वीजेचा मोठा प्रवाह वाहणाऱ्या तारेला रथाचा स्पर्श होऊन दुर्घटना घडली. रथाचा वीजेच्या तारेला स्पर्श होताच प्रवाह वाहू लागल्याने करंट बसून ६ जणांचा मृत्यू झाला. तर, या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. (Jagannath Rath Yatra)
त्रिपुरातल्या कुमारघाट इथं भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती, या रथयात्रेत चार वाजण्याच्या सुमारास ह्या विद्युत प्रवाहाची दुर्घटना घडली. लोखंडाच्या या रथाला शेकडो लोक आपल्य हातांनी ओढथ नगर प्रदक्षिणा करवत होते. त्याचवेळी, रस्त्यातील एका हायव्होल्टेज तारेला ह्या रथाचा स्पर्श झाला. त्यामुळे, रथात वेगाचा करंट पसरला आणि 20 ते 25 जण या प्रवाहात सापडले. 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.
कुमारघाट इथं भगवान जगन्नाथाची रथ यात्रा उत्सव साजरा केला जात होता. यात भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्सहाता काढण्यात आली होती. दरम्यान लोखंडाने बनलेला हा रथ हाजोर भाविक आपल्या हाताने खेचत नेत होते. याचदरम्यान, लोखंडाचा हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. यामुळे वीज रथात उतरली आणि अनेक जणांना वीजेचा धक्का बसला.