Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Inspring Story : ऊसतोडणी कामगाराच्या कडू आयुष्याला तीन मुलींच्या जिद्दिन केल जीवन गोड तिन मुली पोलिस दलात दाखल, आईवडील सुखावले

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 29 June 2023, 13:30

Inspring Story बीड :  भल्या पहाटे उठायच. पोटाची खळगी भरण्यासाठी करपलेली भाकरी, कांदा अन मिरची यांनाच मिष्टांन्न म्हणून खायच. दिवसभर कंबर मोडेपर्यंत काम आणि रात्री उद्याचा दिवस कसा सरणार याची चिंता. ऊसाला गोडसाखरेच रूप देताना आयुश्य कटूतेने भरून जात.  (Inspring Story) पण बीड जिल्ह्यातील सेलू तांडा ( ता. परळी ) गावातील ऊस तोडणी कामगार मारूती जाधव यांच्या तीन मुलींनी परीश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस दलात पोलिस कॅान्स्टेबल पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाने आई वडीलांबरोबर ग्रामस्थांची मान उंचावली आहे. या तिन्ही बहिणींचे सर्वत्र विशेष कौतूक केले जात आहे. (Inspring Story)

महाराष्ट्र राज्यात नुकतीच पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली असून निकाल लागून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पोलिस प्रशिक्षणासाठी गेले आहे. या वेळी मोठ्या संख्येने मुली पोलीस दलात रुजू झाल्या. या भरती प्रक्रियेतून सेलू तांडा ( ता. परळी ) येथील ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या मारुती जाधव यांच्या तीन मुली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या आहेत. अथक मेहनत, परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्या पोलिस दलात भरती झाल्या आहेत. कुटूंबाची साथ असेल तर मुलगी देखील यशाचे शिखर गाठू शकते. हेच या तीन सख्ख्या बहिणींनी पोलिस दलात पोलिस कॅान्स्टेबल पदापर्यंत पोहचून दाखवून दिले आहे.

परळी तालुक्यातील सेलू तांडा मारुती जाधव सुरुवातीला ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. घरची गरबीची परिस्थीती त्यातून प्रपंचासाठी दरवर्षी नवीन साखर कारखान्यावर ऊसतोडणी करावयाचे. गावात जमीन नसल्याने ऊस तोडणी गळीत हंगाम संपल्यावर तेथेच कुठेतरी काम पहायचे. केवळ पावसाळ्यात घराकडे फिरकायचे असा त्यांचा नेहमीचा ऊस तोडणी कामगारांसोबतचा अनुभव होता.

 

पत्नी, पाच मुली आणि दोन मुलगे असा मोठा परिवार असल्याने भाकरीचा चंद्र शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. कष्ट करताना जीवनात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातून मुलींच्या शिक्षणाला त्यांनी साखर शाळेपासून सुरवात केली होती. मुलींना शिकवायचे मोठे अधिकारी बनवायचे असा त्यांचा ध्यास होता. ऊसतोडणी कामगारांच्या समस्यांना कंटाळून त्यांनी अखेर ऊसतोड मुकादम म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, जाधव यांची मोठी मुलगी सोनाली हीची कोरोनाच्या काळात पोलीस भरतीमध्ये निवड झाली झाली. तर दुसऱ्या दोन मुली शक्ती आणि लक्ष्मी या नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाल्या आहेत. तिन्ही बहिणी गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी कसून सराव करीत होत्या. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलीस दलात सेवेत दाखल होणे ही बीडमधील पहिलीच घटना असावी.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना ; वीजेच्या धक्क्याने 7 जणांचा मृत्यू,अनेक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.