दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीसांनी तालुक्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी बनावटीच्या देशी दारु भट्टीवर कारवाई करीत सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सदर गुन्ह्यातील आरोपींवरती भारतीय दंड संहिता कलम ३२८, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील बावडा पोलीस अंकित येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मानवी शरिरास अपायकारक असलेल्या अवैधरीत्या चालू असलेल्या गावठी बनावटीच्या देशी दारूच्या भट्टीवरती इंदापूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये तीनशे लिटरचे ५ बॅलर, दोनशे लिटरचे १२ बॅरल, शंभर लिटरचे १ बॅरल असे दारु निर्मिती करण्यासाठी आणलेला कच्चा माल व दारुसाठी घातलेले (रसायन) नष्ट केले. तसेच एक मोटारसायकल असे एकूण २ लाख २८००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. बी. शिंदे, पोलीस युवराज कदम , पोलीस नाईक मनोज गायकवाड, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवालदार सलमान खान, अमोल गायकवाड, सुनिल कदम, आप्पा हेगडे, महीला पोलीस कॉन्स्टेबल मुजावर, पोलीस विकास राखुंडे,दिनेश चोरमले यांनी केली आहे.