Indapur News : भिगवण, (पुणे) : म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत विहिरीचे रिंग टाकण्याचे काम करीत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार अडकल्याची घटना घडली आहे. Indapur News
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय – ३२), जावेद अकबर मुलानी (वय-३०), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय-३०) व मनोज मारुती चव्हाण (वय-४०, रा. चौघेहि बेलवाडी (ता. इंदापूर) असे ढिगार्याखाली अडकलेल्या चौघांची नावे आहेत. Indapur News
सदराची विहीर हि ८० फुट खोल असून बचावासाठी रात्रभर पाच पोकलेन मशिनच्या साह्याने माती व मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. तसेच एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून युद्द पातळीवरती बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसोबाच्या वाडी परीसरामध्ये ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे काम सुरु आहे. मंगळवारी (ता. ०१) बेलवाडी (ता. इंदापूर) गावातील चार युवक काम करीत होते. विहिरीचा वरचा भाग माती कच्चा मुरुमाचा असल्यामुळे ३० फुट खोल जमिनीमध्ये रिंग (सिमेंट क्राॅक्रिंटीकरण) करण्याचे काम सुरु होते. मात्र अचानक वरच्या बाजुने मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. रात्रभर चार पोकलेन मशिनच्या सहाय्याने माती व मुरुम असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, भिगवण पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी मदत करण्याचे काम करीत होते. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे सकाळी लवकर घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफ जवानाच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे. Indapur News