Indapur News : इंदापूर, (पुणे) : घराशेजारी असलेल्या विहिरीत पडून दीड वर्षाच्या मुलीसह माय – लेकीचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे घडली आहे.
जयश्री अनिल वणवे (वय – २२) व आरोही अनिल वणवे (वय- दीड वर्षे) असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या घटनेमुळे गावावरती शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. Indapur News
पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शुक्रवारी (ता. २५) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जयश्री वणवे या कपडे धुण्यासाठी दीड वर्षाची मुलगी आरुषीला घेवून घराजवळ असलेल्या विहिरीजवळ गेल्या होत्या.
यावेळी घराशेजारी असलेल्या विहिरीतील पाण्यामध्ये बुडून दोघींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, मृत्यू झालेली महिला दोन महिन्याची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत गावामध्ये गर्दी केली. पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी होते. Indapur News