Pune News : पुणे : औंध परिसरतील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने आज सकाळपासून धाडीचे सत्र सुरु केले आहे. आयकर विभागाच्या रडारवर आता बांधकाम व्यवसायिक आले आहेत .
सिंध सोसायटीत आयकर विभागाने छापेमारी…!
पुण्यातील औंध परिसरात असणाऱ्या सिंध सोसायटीत आज सकाळपासून आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. याशिवाय इतर तीन ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायिकांवर ही छापेमारीची कारवाई झाली आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जात आहे. या व्यावसायिकांच्या कागदपत्राची चौकशी देखील सुरू झाली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, छापेमारी करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे अद्यापही समोर आलेली नाहीत. त्यामुळे आता छापेमारीत किती रक्कम समोर येते? बांधकाम व्यावसायिंकामध्ये कोण आयकर विभागाच्या गळाला लागतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :-
आयकर विभागाचा अजब कारभार ; मजुराला पाठवली ६६ कोटी थकबाकीची नोटीस