लोणी काळभोर (पुणे) : गणेशोत्सव काळात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तीन अट्टल गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अमित बालाजी सोनवणे (वय-२६), गणेश बाळू भोसले (वय- २६ रा. दोघेही माळीमळा, महात्मा फुले नगर, लोणीकाळभोर, ता. हवेली) करण ऊर्फ सत्या बाळु पांढरे (वय-२२, रा. खंडोबाचा माळ, उरुळी देवाची, (ता. हवेली) असे येरवडा कारागृह या ठिकाणी स्थानबध्द करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरिर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.
सदर आदेशास अनुसरुन सन २०२२ चे गणेशोत्सव काळात लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखणे करीता अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सुचना पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना दिले होते.
दरम्यान, अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमित सोनवणे, गणेश भोसले, करण ऊर्फ सत्या पांढरे, हे शरिराविरुध्दचे रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेशोत्सव काळात गुन्हा करण्याची व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गणेशोत्सवाचे आनंदात विघ्न येण्याची शक्यता असल्याने सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हेगारांचा प्रस्ताव तयार करुन न्यायालयात सादर केला असता न्यायालयाने सदरचे गुन्हेगारांना गणेशोत्सव कालावधीकरीता येरवडा कारागृह या ठिकाणी स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार सदरच्या तीन गन्हेगारांना येरवडा कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप धनवटे यांनी केली आहे.