प्रा. सागर घरत
करमाळा : मंगळवेढा पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेऊन नेहमीच चर्चेत राहिलेले ज्योतीराम गुंजवटे यांची करमाळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश शुक्रवारी (ता. २६) रात्री काढण्यात आला असून सध्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या जागी ते येत आहेत. शनिवारी (ता. २७) करमाळा पोलीस ठाण्याचा त्यांनी चार्ज घेतला आहे. मंगळवेढा येथे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केले होते.
सध्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनीही करमाळ्यात अतिशय चांगले काम केले आहे. पोलिस वसाहत, करमाळ्यातील नवीन पोलिस ठाणे व पोलिस वसाहत येथे नवीन उभारण्यात आलेला हॉल अशी कामे त्यांची चर्चेत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्याच्या पोलिस ठाण्यात ११ ते १२ वर्षात पूर्ण काळ कामकाज पाहिलेले गुंजवटे हे एकमेव पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी अनेक फरार असलेले संशयित आरोपी पकडले आहेत. मंगळवेढा येथे गुंजवटे यांनी चार्ज स्वीकारण्याआधी दोन वर्षाचा कार्यकाळ कोणीही पूर्ण केला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून त्यांनी कामकाज केले.