Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये कारचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून कोयता, रॉड अन् पिस्तूल दाखवत कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; 2 तरुण गंभीर तर 6 जणांना बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 25 August 2026, 12:55

दौंड : दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरात किरकोळ अपघाताच्या कारणावरून 6 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर पिस्तूल, कोयता, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी, त्यांची आई, आजी व मावस भावांवर जीवघेणा हल्ला चढवून गंभीर जखमी करणाऱ्या या टोळक्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तात्काळ सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अशपाक अन्सार सय्यद (रा. बालाजी नगर, दौंड), कृष्णा भूपेंद्र भूल (सध्या रा. गोपाळवाडी, ता. दौंड, मूळ रा. अछाम, नेपाळ), अमोल ज्ञानेश्वर मुळे (रा. शिवाजीनगर, खवठे हॉस्पिटलमागे, दौंड), झहीर नजीर सय्यद (रा. बिलावल गार्डन, दौंड), सज्जस शौकत सय्यद (रा. पर्ल पार्क अपार्टमेंट, बिलावल गार्डन, दौंड) व तबरेज शौकत सय्यद (रा. पर्ल पार्क अपार्टमेंट, बिलावल गार्डन, दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत यश नवनाथ गायकवाड (वय -20, व्यवसाय शिक्षण रा. कासुर्डी, ता. दौंड जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासुर्डी (ता. दौंड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थी यश नवनाथ गायकवाड हे सोमवारी (ता. 24) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबासह कारमधून महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपी कृष्णा भूल याने आपल्या ताब्यातील दुचाकीने यश यांच्या कारला धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाल्याने यश यांनी नुकसानभरपाई मागितली. याचाच राग मनात धरून आरोपींनी तात्काळ आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले.

काही वेळातच 6 जणांचे टोळके हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन घटनास्थळी आले. यावेळी झहीर सय्यद याच्या हातात कोयता होता. तर सज्जस सय्यद याच्या हातात लोखंडी रॉड होता. तबरेज सय्यद याने आपल्या कमरेला पिस्तूल लावले होते. अशपाक सय्यद व इतर 4 ते 5 जण हातात हॉकी स्टिक घेऊन आले होते. या सर्व आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने यश गायकवाड, त्यांची आई, आजी आणि मावस भाऊ मंथन व स्वानंद यांच्यावर तुफान चढवला. टोळक्याने केलेल्या या हिंसक मारहाणीत मंथन आणि स्वानंद हे दोघे गंभीर जखमी झाले.

 

दरम्यान, भरदिवसा मुख्य रस्त्यावर झालेल्या या हिंसक गुंडगिरीमुळे दौंड शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. दौंड पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सर्व 6 आरोपींचा शोध घेतला आणि पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सर्वांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करत आहेत

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48
Next Post

“तू मित्राशी बोललाच कसा?” पुण्यात संतापलेल्या शिक्षकाने 11 वर्षीय विद्यार्थ्याला केली मारहाण; पालकांनी केला गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp