पुणे : शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पत्नीकडून १० लाख रुपये पतीने उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ सुपेकर असे गुन्हा दाखल करण्यात पतीचे नाव आहे. याप्रकणी एका महिलने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ सुपेकर याने २२ वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने लग्नाचा आग्रह करुन तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यावेळी तिचे अश्लील व्हिडीओ काढले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिच्याकडून १० लाख रुपये उकळले.
हा सगळा प्रकार २०२० पासून सुरु होता.
याप्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सौरभ सुपेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.