Hadapsar News : पुणे : हॉटेलमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत एका कर्मचाऱ्याने सहकारी तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वैदवाडी (हडपसर) येथील एम के एम कॅन्टीन (केरला हॉटेल) मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी हडपसर परिसरातच राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहजाद इमामन अन्सारी (वय ३०, रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम इद्रिस शेख (वय-४३) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही वैदवाडी (हडपसर) येथील एम के एम कॅन्टीन (केरला हॉटेल) मध्ये काम करीत आहे. तर दोन्ही आरोपीसुद्धा त्याच हॉटेलमध्ये काम करीत आहेत.
दरम्यान, आरोपी शहजाद अन्सारी याने हॉटेलमध्ये कोणी नसताना फिर्यादी यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सदर प्रमाण २० ऑगस्ट २०२३ पासून वेळोवेळी घडला आहे.
त्यानंतर दुसरा आरोपी मोहम्मद शेख याने फिर्यादी यांना “मुझे भी चाहिये, मुझे भी करना है” असे बोलून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.