Hadapsar News : हडपसर, ता. ३१: जागेचा वादावरून घरात घुसून महिलांवर बलात्कार करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
कारखाण्याचा मालक व किसन राकेश मिश्रा (वय २०) आणि लवकुश तिवारी (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील शिंदे वस्तीत कारखान्यात काम करणार्या महिलेचे पती रात्री ड्युटीवर गेले होते. त्यावेळी मालकाने कारखान्यात ऑर्डर आहे, असे खोटे सांगून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर पतीला व मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकविणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार करुन मानसिक छळ केला. याप्रकरणी पोलिसांनी कारखाना मालकाला अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने दोघे जण घरात शिरले. त्यांनी फिर्यादी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, हडपसर पोलिसांनी किसन राकेश मिश्रा (वय २०) आणि लवकुश तिवारी (वय ३५) यांना अटक केली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मुळ वाद हा जागेवरुन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.