हडपसर, (पुणे) : झोमॅटो या कंपनी मार्फत अन्नपदार्थ देण्यासाठी गेलेल्या तरुणास रात्रीच्या वेळी लुबडणाऱ्या एका अल्पवयीनसह तिघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि घटना मंगळवारी (ता. १२) रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी गाव परिसरात घडली होती.
अरूण दिगंबर राऊत (वय २०), कुणाल कैलास गायकवाड (वय २०, रा. दोघेही पवार आळी फुरसुंगी), व एक विधीसंघर्षित बालक असे ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी नितेश कांबळे (वय – २४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल व रोख रक्कम असा १० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश कांबळे हे झोमॅटो द्वारे आलेली ऑनलाईन ऑर्डर देण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कांबळे हे मॅजेस्टीक नेस्ट सोसायटी समोरील मोकळया जागेसमोर, फुरसुंगी गाव आले असता ऑर्डर मागवणारे तिन इसमांनी ऑनलाईन जेवन मागवून, ऑर्डर का उशीरा आली, तुला पैसे देणार नाही असे म्हणाले.
यावेळी तिघांनी ऑर्डरचे पैसे न देता, फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम ५ हजार २०० एक मोबाईल फोन व त्यामधून फोन पे वरून २ हजार ८८० रुपये ऑनलाईन कोणाचे तरी युपीआयवर ट्रान्सफर केले. याबाबत हडपस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार प्रशांत दुधाळ व अमोल दणके यांना गोपनीय माहीती मिळाली की, फुरसुंगी गावाचे ओढ्यालगत सदर गुन्ह्यातील आरोपी थांबले आहेत. जाऊन पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम असा १० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या आदेशानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांचे पथकाने केली आहे.