Hadapsar News हडपसर, ता. 13 : बसमध्ये चढत असताना क्षणात गळ्यातील 3 लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर गडीतळ येथे १५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Hadapsar News

याप्रकरणी पुष्पा एकनाथ ननावरे (वय ६८, रा. उन्नतीनगर, गाडीतळ, हडपसर) यांनी याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे या गाडीतळ येथून वारजे माळवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण नकळत लंपास केले. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच गंठण हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला. तसेच मुलगा दत्तात्रय ननावरे यांना घटनेची माहिती देऊन त्यांनाही बोलावून घेतले. मात्र, चोरट्याचा काहीही मागमूस लागला नाही. Hadapsar News
चोरीस गेलेले गंठण सुमारे २० ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे ३ लाखांहून अधिक आहे. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. Hadapsar News







