Hadapsar News : लोणी काळभोर, (पुणे) पुण्यातील पोलीस निरीक्षकाचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.(Hadapsar News)
६९ हजार ९९९ रुपये पाठविण्यास भाग पाडले.
संतोष गिरीगोसावी (रा. खराडी, चंदननगर,) असे त्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून याप्रकरणी त्यांचे पुतणे स्वागत नवनाथ गोसावी (वय ३६, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Hadapsar News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गिरीगोसावी हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. सायबर चोरट्यांनी गोसावी यांचे अकाउंट हॅक करून त्या अकाउंटचा वापर करत स्वागत गोसावी यांना मेसेज केला. स्वागत गोसावी यांना वाटले संतोष गिरीगोसावी हेच मेसेज करत आहेत.(Hadapsar News)
स्वागत गोसावी यांना दिलेल्या नंबरवर फोन करण्यास भाग पाडले. त्या मोबाईल नंबरवरुन फिर्यादी यांना व्हॉटसअपवर फर्निचरचे फोटो पाठवले आणि तत्काळ ६९ हजार ९९९ रुपये पाठविण्यास भाग पाडले.(Hadapsar News)
दरम्यान, स्वागत गोसावी यांनी पैसे पाठवल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप शिवले पुढील तपास करीत आहेत.