Hadapsar News पुणे : रिक्षाचालकाला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Hadapsar News) हा प्रकार हडपसर भागात घडला. याबाबत ६५ वर्षीय रिक्षाचालकाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Hadapsar News)
हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक नाना पेठेत राहायला आहेत. रिक्षाचालक कॅम्प येथील ऑरोरा टॉवरजवळ प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एक जण रुग्णाला घेऊन हडपसर येथे जायचे असल्याचे सांगून रिक्षात बसला. प्रवाशाने हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर रिक्षा थांबवायला सांगितली. तो ज्यूस घेऊन आला. त्याने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते.
रिक्षाचालकाला गुंगी आल्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि हातातील अंगठ्या असा दोन लाख सात हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करीत आहेत.