Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ससाणेनगर येथील एक सराईत गुन्हेगार पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे. अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.
२ वर्षांसाठी तडीपार
दत्ता विठ्ठल भुसने, वय – २९, रा. गल्ली न. ११, ससानेनगर, हडपसर, पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करायचा. लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये, तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने हि कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव पाठविला असता, शर्मा यांनी सदर सराईतास पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदिप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे, सारिका जगताप ,महेश उबाळे, पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे, राजश्री खैरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे यांनी केली आहे.