Hadapsar News पुणे : पुण्यात शारीरीक व मानसिक छळातून एका विवाहितेने गळाफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने हे टोकाचे पाऊस उचलले आहे. ‘तुझ्यामुळेच वाटोळे झाले आहे. तू मरून गेलीस तर माझ्या मागची पीडा जाईल’, असे म्हणून विवाहितेला टोचून बोलले जात होते. हा प्रकार २०१३ पासून ११ मार्च २०२३ दरम्यान घडला.
अनिता विजयकुमार शिंदे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar News) ठाण्यात पती विजयकुमार बबरुवान शिंदे (वय ४२) याच्यासह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देविदास बाबुराव मणचुके ( रा. बीड) यांनी तक्रार दिली आहे.
मानसिक छळातून एका विवाहितेने गळाफास घेत आत्महत्या…!
पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, अनिता यांचा विजयकुमार शिंदे याच्याबरोबर २००७ साली विवाह झाला होता. लग्नानंतर पती आणि सासू-सासर्यांसोबत त्या राहत होत्या. दरम्यान, २०१३ पासून पती आणि सासरच्यांनी कौटुंबिक कारणावरून शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक छळ सुरु केला. मारहाण होत होती. तसेच ‘तुझ्यामुळेच माझे वाटोळे झाले आहे. तू मरुन गेलीस तर माझ्या पाठीमागची पीडा निघून जाईल’, असे बोलून तिचा छळ केला गेला. या छळाला कंटाळून अनिता हिने ११ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
शिरूर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, सिंहगड रोड परिसरातील घटना..!
बारामतीतील सांगवी येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या