Gautami Patil | बार्शी : गौतमी पाटीलच्या लावणीची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडलीय. गौतमी पाटीलचा शो त्याठिकाणी प्रचंड गर्दी असंच समीकरण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पहायला मिळत आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे.
वेळेची मर्यादा ओलांडल्यानं पोलिसांनी गौतमीचा कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे गौतमीची अदाकारी पाहण्यासाठी आलेल्या बार्शीकरांना तिच्या एकाच गाण्यावर समाधान मानावं लागलं. गौतमीच्या नृत्याचा आस्वाद न घेता आल्याने बार्शीकर नाराज झाले.
दरम्यान, औरंगाबाद येथे गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी पत्र्याचा शेड तुटून चाहते जखमी झाले आहेत. गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत.
गौतमीचा शो पाहण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. गौतमी पाटील शो पाहण्यासाठी एका फॅननं चक्क सुट्टीसाठी अर्ज केला. त्यात गौतमी पाटील गावात येणार असल्यानं दोन दिवसांची रजा मिळावी असा मजकूर लिहिला. संबंधित चालक सांगलीच्या तासगाव आगारातील एसटी चालक असल्याचे या रजा अर्जावरून समोर येत आहे. 22 आणि 23 मे रोजी दरम्यान गौतमी पाटील येणार असल्याची तारीख या रजेच्या अर्जात टाकलीय.
मात्र या सर्व प्रकारची सत्यता तपासली असता वेगळंच सत्य समोर आलंय. हा अर्ज पूर्णपणे खोटा असून त्यावरील चालकाची सही देखील बोगस आहे. तसंच तासगावच्या एसटी विभागाकडे असा कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज देखील आला नसल्याचं समोर आलंय. मात्र संबंधित एसटी चालकाचा हा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Gautami Patil | गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण ; एकाला जामीन मंजूर