विशाल कदम
Fraud | लोणी काळभोर : चॉकलेट पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रीय झाली आहे. या टोळीने महिलांकडून प्रत्येकी ३०० रुपये प्रमाणे पैसे उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांनो सावधान, जर कोणी अशा प्रकारची खोटी बतावणी करीत असेल तर त्याच्या अमिषाला बळी पडू नका. नाहीतर तुमचीही आर्थिक फसवणूक होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेट पॅकिंग असे ट्रू कॉलरवर लिहिलेल्या फोन नंबरवरून महिलांना सर्वात प्रथम व्हॉट्स ॲपवर मेसेज येतो. तुम्हाला घरी बसून काम हवे आहे का ? अशी विचारणा केली जाते. आपल्याला घरी बसून काम मिळणार असल्याने महिला त्याला प्रतिसाद देतात. त्यानंतर महिलांच्या मोबाईलवर चॉकलेट, पॅकिंग मशीन व वजनकाटे यांसारखे फोटो पाठवितात.
महिलांचे नाव, पत्ता विचारला जातो. जर काही महिलांना या बद्दल शंका निर्माण झाली. तर महिलांना खात्री करण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे एक महिला बचत गट आहे. असे म्हणून एका महिलेशी संपर्क साधण्यासाठी एक फोन नंबर दिला जातो. फोनवर चौकशी केली असता, महिलांची खात्री होईल अशी पध्दतीशीर माहिती दिले जाते.
१०० किलो चॉकलेट पॅकिंग साठी ५ हजार रुपये…
महिलांना १०० किलो चॉकलेट पॅकिंग साठी ५ हजार रुपये दिले जातेल. असे सांगितले जाते. वन टाईम डिलिव्हरी चार्जेस म्हणून ३०० रुपये फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून एका महिलेच्या नावावर पैसे मागितले जातात. खात्री पटली असल्यामुळे तसेच पैसे सुरु होतील या अपेक्षेने महिला त्यांना ३०० रुपये त्या नंबरवर पाठवितात. त्यानंतर तुम्हाला २ दिवसात माल मिळेल असे सांगितले जाते.
त्यानंतर महिलांना खोटा ऑर्डर नंबरही पाठविला जातो. यामुळे आता ऑर्डर सुरु होतील अशी आशा महिलांना लागते. परंतू त्यानंतर दिलेला त्यांचा फोन नंबर बंद होतो. या प्रकारे महिलांची फसवणूक केली जात आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, उरुळी कांचन येथील महिलांनी या बाबतच्या तक्रारी पुणे प्राईम न्युज कडे केल्या आहेत. याबाबत पुणे प्राईम न्युजने गेल्या दोन दिवसांपासून संबधित क्रमांकावर फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.
जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपल्या नावासह अनुभव ९८२२३८२२२२ या व्हाॅट्सअप क्रमांकावर पाठवा. त्यास पुणे प्राईम न्यूजच्या माध्यमातून प्रसिध्दी दिली जाईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या वाहनचालकाला मारहाण..
Uruli Kanchan | कोरेगाव मूळ येथील कैलास शितोळे यांचे अल्पशा आजाराने निधन..!
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे लोणी काळभोर पोलिसांचा रुट मार्च..!