Fraud News पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Fraud News) या प्रकरणी याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोघांवर चतु:शृंगी पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुजित शिवाजी साळुंखे (वय २५, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय २६, रा. वडोली, ता. माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Fraud News)
पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुर्नवसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासविले होते.
दरम्यान, भरती प्रक्रियेत आरोपी साळुंके, माने यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.